गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे मदत केंद्र

सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने गणेश भक्ताचे हार्दिक स्वागत

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख प्रवीण कोल्हे व पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या गणेश भक्त मुंबईकर चाकरमान्यासाठी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने उभारण्यात आलेल्या मदत केंद्र व स्वागत कक्षाचा शुभारंभ आज शनिवार दि.१२ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख प्रवीण कोल्हे व कणकवली तालुका पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

या कार्यक्रमाला खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,संकेत शेट्ये, महेश कोळसुलकर,किरण गुरव,सहायक पोलिस फौजदार जामसंडेकर पोलिस श्री राणे, खारेपाटण पोलिस स्टेशनचे हवालदार मिलिंद देसाई, पोलिस कॉन्स्टेबल सुनील निकम,उद्देश कदम,श्री बावदाणे,ट्रॅफिक पोलिस श्री पाटील,कणकवली पोलिस स्टेशनचे पोलिस सागर जाधव, विठ्ठल कोकरे,आदी मान्यवर पदाधिकारी व पोलिस अधिकारी प्रवासी गणेश भक्त उपस्थित होते.

यावेळी मुंबईवरून एस टी तसेच खाजगी वाहनाने येणाऱ्या गणेश भक्त चाकरमानी यांचे या मदत केंद्र च्या पोलिसांच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच प्रवासी भक्तासाठी चहा,बिस्कीट व पाण्याची व्यवस्था सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या व स्थानिक खारेपाटण पोलिस आउट पोस्ट च्या वतीने करण्यात आली.तर ट्रॅफिक जाम चा फटका बसून सुमारे १२ ते १६ तास प्रवास करून थकलेले प्रवासी भक्त तसेच त्यांना सुरक्षित घेऊन याने वाहक व चालक यांचे पोलिस यांच्या वतीने स्वागत करून पुढील प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने शुभेच्छा देण्यात आल्या.

सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गणेश भक्त प्रवाशामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!