शिवसेनेच्या जानवली जि.प.उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध

शिंदे शिवसेनेने जिल्ह्यात खाते खोलले; ठाकरे सेनेला आणखी धक्का

उबाठा सेनेच्या हेलन कांबळे यांची जानवली जि. प. मधून माघार

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीच्या जानवली जि प मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपा शिवसेना युतीकडून सिंधुदुर्गात ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. जानवली जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

error: Content is protected !!