पालकमंत्र्यांचा एक मेसेज आणि झाडीचे काम तमाम
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा कार्यतत्परपणा पुन्हा एकदा समोर आलाय. कणकवली तालुक्यातील हळवल शिवडाव मार्गांवर मोठ्या प्रमाणात झाडीचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत पत्रकार उमेश परब यांनी मंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले. पत्रकार उमेश परब यांचा एक मेसेज पालकमंत्री यांना गेला आणि नेहमीच आपल्या कार्यतत्पर शैली साठी प्रसिद्ध असलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपला अधो रेखित करत हळवल शिवडाव शिवडाव मार्गांवरील वाढलेली झाडी तोडण्याचे आदेश दिले. आणि त्यानंतर झाडी हटविण्याचे काम सुरु करण्यात आलेय.
हळवलं शिवडाव मार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यासोबत शालेय मूल देखील बसने प्रवास करत असतात. या मार्गाच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या झाडी मुळे अपघात होण्याची शक्यता होती. ही झाडी गणेशोत्सवापूर्वी तोडावी अशी मागणी ग्रामस्थांची होती. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधताच झाडी तोडण्याचे काम सुरु करण्यात आलेय. सामान्यांची हाक ऐकणारे. पालकमंत्री म्हणुन परिचित असलेल्या मंत्री नितेश राणे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे हळवल शिवडाव मार्ग झाडी मुक्त होतोय. त्यासाठी हळवल व शिवडाव गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे आभार मानलेत.












