खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजप चे ज्येष्ठ कार्यकर्ते व खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी आज मंगळावर दि.२७ रोजी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे खारेपाटण पंचायत समितीची निवडणूक आता रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे आता बोलले जात आहे.
दरम्यान खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ हा शिवसेना भाजप महायुतीकडे शिवसेना शिंदे पक्षाकडे गेला असल्यामुळे या मतदार संघात शिंदे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते गुरुप्रसाद शिंदे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली होती.तर याच मतदार संघात श्री रामकांत राऊत (अपक्ष,भाजप), रफिक नाईक (अपक्ष,शिंदे शिवसेना),बाळा राऊत (शिवसेना उबाठा) मंगेश गुरव (डमी उमेदवार शिंदे शिवसेना ) यांनी उमेदवारी अर्जं दाखल केले होते. यापैकी मंगेश गुरव, रमाकांत राऊत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जाते.
” जनतेच्या आग्रहास्तव व त्यांच्या पाठिंब्यावर मी खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवत होतो.परंतु आज मी माझा उमेदवारी अर्ज पक्षश्रेष्ठी यांचा आदर करून उमेदवारी अर्ज मागे घेत आहे.मात्र खारेपाटण विभागातील मतदार जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वासाला कायम ठेऊन याही पुढे जनतेचे विकासाचे काम करत राहून जनतेला न्याय देणार.”










