अशा एकत्र येण्यातून, सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या संघटनेची एकात्मता अधिक दृढ करावी आणि बदलत्या व्यापारी व्यवस्थेला सामोरे जावे – श्रीनिवास नाडकर्णी

आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार प्राप्त, व्यापाऱ्यांनी भान राखून आपली एकी दाखवून द्यावी – नागेश कोरगावकर

फोंडाघाट मध्ये व्यापारी संघातर्फे खाद्य सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र (फास्टेक )कार्यक्रम उत्साहात संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारतीय अन्नसुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र (फोस्टक) आणि भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (फैसी) द्वारे संरचीत प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे, अन्न सुरक्षा अनुपालन अंतर्गत बेसिक आणि ॲडव्हान्स वर्गाचे आयोजन फोंडाघाट व्यापारी संघातर्फे नुकतेच घेण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षक दत्तप्रसाद पांडा, संतोष गीते, रवींद्र जाधव, उदय सावंत, भास्कर घोगळे यांचे समवेत व्यापारी संघाचे अध्यक्ष यशवंत मसुरकर,दिनेश नारकर, गुणेश कोरगावकर, इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीनिवास नाडकर्णी यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्हा पुरस्कार प्राप्त, फोंडाघाट व्यापारी संघाचे कार्य विशद करताना, व्यापाऱ्यांसाठी या पुढील काळ संघर्षाचा,अभ्यासाचा आणि अपडेट राहण्याचा आहे. येणाऱ्या नवीन गोष्टी, अशा प्रशिक्षणातून नियमांचे काटेकोर पालन करून आपला उद्योग सक्षम करण्याचा आहे. आणि त्यासाठी आपल्या व्यापारी संघाच्या उपक्रमांना, शिस्तबद्ध पाठिंबा देऊन, उपस्थित राहून, सर्वांनी आपली एकी ही एकात्मता जोपासावी. असे आवाहन केले. आपली संघटना जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे. मात्र त्यासाठी आपणा सर्वांचे नि:स्वार्थ सहकार्य अपेक्षित आहे.यामुळे बदलणारे नियम आणि त्यांना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण वेळोवेळी आपण घेऊच असे माहितीपर उद्गार सचिव गुणेश कोरगावकर यांनी सांगितले. बदलणारे नियमांना घाबरून न जाता, त्याला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी, नियमांची माहिती, अभ्यास असणे गरजेचे आहे. ते अशा प्रशिक्षणातून प्राप्त होते. याचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन उद्योजक दिनेश नारकर यांनी केले. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये ग्रामीण भागातील उद्योगांचा प्रकल्प अहवाल सादर केल्यास, त्याचा अभ्यासक्रमामध्ये विषय म्हणून अंतर्भाव होईल. त्यासाठी आपल्या गावातून प्रयत्न व्हावेत.असे उद्गार प्राध्या. आर. बी. पाटील यांनी काढले.

या दोन्ही शिबिराचा फोंडाघाट मधील सुमारे १५० व्यापाऱ्यांनी भाग घेऊन, अन्नसुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन प्रमाणपत्र प्राप्त केले. या शिबिरा साठी संदीप पारकर, बंटी माळवदे, व्यंकटेश लाड यांनी परिश्रम घेतले. याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले..

error: Content is protected !!