श्री ब्राह्मण देव मंदिर आचरा पारवाडी येथे ५ फेब्रुवारी रोजी त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह….!

आचरा (विवेक परब) : आचरा पारवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत त्रैवार्षिक हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आला आहे. या सप्ताहाला नामांकित भजन मंडळे आपली भजन रुपी सेवा सादर करणार आहेत. तसेच गुरुवार ५ फेब्रुवारी ते रविवार ८ फेब्रुवारी या सप्ताह कालावधीत रात्रौ ठिक ११.३० ते ०१ वा. यावेळेत स्थानिक श्री ब्राह्मणदेव दिंडी मंडळ आचरे-पारवाडी यांचा चित्ररथ दिंडी कार्यक्रम सादर होणार आहे.

तसेच मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी दु.३ वा. श्री सत्यनारायण महापुजा व त्यानिमित्ताने रात्रौ ठीक १०.०० वा. ‘श्री देवी माऊली, पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ इन्सुली, सावंतवाडी यांचा “धर्मविजय” हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार भाविक भक्तांनी हरिनाम सप्ताह, तिर्थप्रसाद व दशावतार नाट्य प्रयोग कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरे-पारवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!