प्राथमिक शिक्षक राघोबा झिलू गावडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली गावडेवाडी येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक राघोबा झिलू गावडे (वय. ८९) यांचे वृद्धापकाळाने रविवारी राहत्या घरी दुःखद निधन झाले. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी ग्रामीण भागात उत्तम काम केले होते. निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे विशेष लक्ष दिले होते. निवृत्त प्राथमिक शिक्षक उदय गावडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!