खारेपाटण (प्रतिनिधी) : दिनांक २१/८/२०२६ रोजी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच २१ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पोंभुर्ले गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती च्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा किशोर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या. निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी गावच्या सरपंच प्रियांका धावडे देवगड पंचायत समिती सदस्य सादीक डोंगरकर पोलिस पाटील राखी मोंडे ग्रामपंचायत सर्व सदस्य विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या दोन वर्षांत किशोर कांबळे आणि सहकारी यांनी गावातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी गावातील छोटे मोठे तंटे गावातच मिटण्यात यशस्वी झाले आहेत. ग्रामीण भागातील लोकांचे तंटे सोडवत असताना मोलमजुरी करणार्या लोकांना एक दिवस खाडा करून ग्रामपंचायत बसणे शक्य नसते अशावेळी रात्री त्यांच्या घरी जाऊन तंटे सोडवत गाव तंटामुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
किशोर कांबळे हे पोंभुर्ले बौद्धजन उन्नती मंडळ ग्रामीण शाखेचे माजी अध्यक्ष व देवगड ता. बौध्दजन सेवा संघ विजयदुर्ग विभागाचे बौध्दाचार्य म्हणून काम करत असून सामाजिक कार्यात देखील त्याचा मोठा सहभाग असतो.सरपंच सौ प्रियंका धावडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.












