लोकनेता स्व. अजितदादांना फोंडावासीयांची विनम्र श्रद्धांजली ! जागवल्या आठवणी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री देव राधाकृष्ण मंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना त्यांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त करत आणि व्यापारी संघ आणि फोंडावासीयांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. राजेंद्र पावसकर यांनी स्व. दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना कुमार नाडकर्णी यांनी दादांचा स्वभाव स्पष्ट, परखड, पक्षातीत व्यक्तिमत्व, गोरगरीब-सामान्य जनतेची कामे तातडीने होण्याकडे, अधिकारी-प्रशासनावर अंकुश अशा शब्दात या लोकनेत्याचे वर्णन केले. घोणसरी धरणाच्या घळभरणी प्रसंगी आले असताना विस्थापित, भूमीहीन आणि परतावा न मिळालेल्या धरणग्रस्तांचा प्रश्न निकाली काढण्याच्या दादांची आठवण सांगून आदरांजली वाहिली. तर संतोष टक्के यांनी असा नेता होणे नाही असे सांगून स्व. दादांच्या आठवणी काढून श्रद्धांजली वाहिली.

अजित दादांना चिरशांती लाभो आणि पवार कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ लाभो ! अशी स्तब्धता पाळून फोंडावासीयांनी प्रार्थना केली आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोरे, भाऊ सावंत, महेश भोगले, रामदास, रंजन चिके कुबड, केसरकर, दिनेश नारकर, मुन्ना कुबडे आणि अनेक व्यापारी उपस्थित होते.

error: Content is protected !!