कळसुलीत प्राची आमडोसकर यांचा घरोघरी प्रचार

संत रोहिदास जयंतीनिमित्त केले अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या शिवसेना उबाठा च्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार प्राची रुपेश आमडोसकर यांनी कळसुली गावात घरोघरी जाऊन प्रचार केला. कळसुली विभागातील जनतेला विकास हवा असून यावेळी जिल्हा परिषद निवडणूकीत बदल करण्याचा निश्चय जनतेने बोलून दाखवला. सत्ताधारी नेत्यांनी केवळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. प्रत्यक्षात विकास कागदावरच राहिला आहे. असे कळसुली गावातील जनताच स्वतः म्हणत आहे. प्राची आमडोसकर यांनी कळसुली गावात घरोघरी जाऊन प्रचार केला असता मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कळसुली गावात राष्ट्रसंत संत रोहिदास महाराज यांच्या 650 व्या जयंती चे आयोजन 1 फेब्रुवारी रोजी रोहिदास नगर येथे करण्यात आले होते. यावेळी प्राची आमडोसकर यांच्यासह रुपेश आमडोसकर, तसेच शिवसैनिकांनी संत रोहिदास जयंती उत्सवाला भेट देत संत रोहिदासांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी रोहिदास नगर मधील बहुसंख्य रहिवासी उपस्थित होते.

error: Content is protected !!