“द स्कॉलर ऑफ सिंधू अवार्ड” साठी प्राथ. शिक्षक संघ सिंधू तर्फे स्कॉलरशिप सराव परीक्षा संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग तर्फे घेण्यात येणाऱ्या मोफत सराव परीक्षेचा शुभारंभ फोंडा केंद्र शाळा येथे दीप प्रज्वलनाने आणि देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. शुभारंभाचे अध्यक्षस्थाना वरून शिक्षणप्रेमी श्रीनिवास नाडकर्णी यांनी आपले जीवनात अनेक परीक्षा येतात, त्यांना अभ्यासपूर्ण सामोरे जाऊ या. ‘मी परीक्षेत चांगल्या मार्काने पास होणार’ हा ऊर्जा मंत्र जागृत केला. सरावातून यश या प्राथमिक शिक्षक संघाच्या उपक्रमाचे आणि शिक्षक वर्गाचे त्यांनी कौतुक केले.

प्रस्तावनेत संजय सावंत यांनी याच सराव परीक्षेतून तालुका व जिल्हा पातळीवरील यशवंतांमधून “द स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवार्ड” परीक्षार्थी मिळेल आणि त्याला विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येईल असे सांगितले. या सराव परीक्षेत फोंडा केंद्रातील शाळा, डांबरे, तीवरे हरकुल शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होते. त्यांना सुनील ठाकूर, मनोज गव्हाणकर, सुनील चव्हाण, सुभाष गावकर, राजेंद्र गोसावी, रेणुका जोशी, श्रेया नांचे, साधना कांबळे, रंजना पाटील, वेदांगी नारकर, देवकाते, गांगुर्डे इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन गव्हाणकर यांनी तर आभार प्रदर्शन सुनील चव्हाण यांनी केले.

error: Content is protected !!