कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन

कणकवली (प्रतिनिधी़) : कलमठ गावडेवाडीचे श्रद्धास्थान श्री देव लिंगेश्वर मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा साेमवार दि. 1 मे रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सत्यनारायण महापुजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9:30 ते 11.30 सत्यनारायणाची महापूजा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद,दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. लहान मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम, त्यानंतर सायंकाळी 6 वा काेटेश्वर.प्रासादिक भजन मंडळ, हरकूळ बु. बुवा सुजित परब, पखवाज हर्षद राणे यांचे भजन हाेणार आहे.

रात्री  9 वा.पासून २०-२० महिला डबलबारीचा जंगी सामना श्री स्वामी समर्थ नवतरूणी भजन मंडळ लोरे : नं.1 नरामवाडी (ता.कणकवली) बुवा : रिया मेस्त्री, गुरूवर्य राजेश मेस्त्री,पखवाज मिलिंद लाड,तबला संकेत पवार विरुद्ध अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळ – साळेल (ता.मालवण) ,बुवा : अंकिता गावडे,गुरुवर्य : बुवा विजय ( गुंडू ) सावंत, पखवाज : योगेश सामंत, तबला : गजानन देसाई यांच्यात हाेणार आहे.

भाविक भक्तांनी तीर्थप्रसाद, महाप्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लिंगेश्वर मित्र मंडळ व ग्रामस्थ कलमठ गावडेवाडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!