कणकवलीतील स्टॉल हटाव मोहिमेला १५ दिवसांची स्थगिती

१५ दिवसांनंतर आम्ही स्वतः स्टॉल हटवतो; स्टॉल धारकांचे लेखी आश्वासन

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावरील हायवे चौपदरीकरण उड्डाणपुलाखाली असलेले कणकवली पटवर्धन चौकातील स्टॉल हे हायवे प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हटविण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हायवे उड्डाणपुलाखाली टॉल धारकांनी स्टॉल उभारले. याच पार्श्वभूमीवर हायवे प्राधिकरणचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन पुन्हा एकदा कणकवली पटवर्धन चौकातील स्टॉल हटाव मोहिमेला दुपारच्या सुमारास उतरले. जेसीबी आणि पोलीस बंदोबस्ताच्या सहाय्याने काही स्टॉल देखील हटविण्यात आले. मात्र कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी अटकाव करत जनसामान्य गोरगरीब जनता या ठिकाणी स्वतःचे पोट भरत असल्याने स्टॉल हटविण्यात येऊ नये, असे सांगत ही स्टॉल आता मोहीम थांबवली. उड्डाण पुलाखाली स्टॉल हटवून तुम्ही या ठिकाणी गार्डन करणार आहात की या ठिकाणची जागा डेव्हलप करणार ? हायवे पूर्ण होऊन चार वर्षे झाली. चार वर्षात तुम्ही काय केला ते दाखवा ? आणि नंतरच स्टॉल हटवा असे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगत स्टॉल हटाव मोहीम थांबवली. मात्र यावर न थांबता प्राधिकरण आणि प्रशासनाने कारवाईचा बडगा सुरूच ठेवला. तसेच स्टॉल धारकांनी याच महिन्यात पंधरा ते वीस दिवस सिजनचा धंदा असतो असे सांगत आम्ही पुढील पंधरा-वीस दिवसांनंतर हे स्टॉल स्वतःहून बाजूला करतो. स्टॉल हटविण्यासाठी आपणास याठिकाणी यायची गरज भासणार नसल्याचे देखील लेखी लिहून दिले. त्यानंतर पुढील कारवाई 15 दिवसांच्या मुदतीवर थांबविण्यात आली. यावेळी फळे, फुले, भाजीपाला विक्रेते तसेच कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री, फुल विक्रेते बाळा पावसकर, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, अनिल हाडळ, महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता रुपेश कांबळे, पोलीस हवालदार मंगेश बावधाने, विनोद चव्हाण, दंगल नियंत्रण पथक, स्वरूप कोरगावकर, प्रसाद कोरगावकर, बंटी पावसकर, भाई पावसकर यांच्यासह उड्डाणपुलाखालील स्टॉलधारक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!