एसटीएस स्पर्धा ‘ परीक्षेत कासार्डे विद्यालयाचा अथर्व सावंत रौप्य पदकाचा मानकरी…

तळेरे केंद्रातही अव्वलस्थानी !

तळेरे (प्रतिनिधी) : “सिंधूरत्न टॅलेंट सर्च” जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.७ वी मधील कु.अथर्व सत्यविजय सावंत हा तळेरे केंद्रामध्ये प्रथम आला आहे. कु.अथर्व सावंत हा जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत १३६ गुणांसह रौप्य पदकाचा मानकरीही ठरला आहे. या परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा निकाल१००% इतका लागला आहे. या सर्व विदयार्थ्यांना विद्यालयातील एस.टी.एस.परीक्षा विभागातील शिक्षक श्री. वाय.एस.परब, सौ.पी.जी. पाताडे,श्रीम.पी.वाय.सुतार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष श्री.संजय पाताडे, शिक्षण समिती चेअरमन श्री. अरविंद कुडतरकर, माजी कार्याध्यक्ष तथा सल्लागार श्री.प्रभाकर कुडतरकर इतर सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयचे प्राचार्य श्री.एम.डी.खाडये,पर्यवेक्षक श्री.एन.सी. कुचेकर व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!