वायंगणी श्री देव रवळनाथ डाळपस्वारी सोमवार ९ फेब्रुवारी पासून

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे ग्राम दैवत श्री देव रवळनाथ डाळपस्वारी सोहळा (वायंगणी परिक्रमा) सोमवार o९/०२/२०२६ ते शुक्रवार १३/०२/२६ या कालावधी संपन्न होणार आहे. सोमवार ०९ फेब्रुवारी रोजी दुपारी देवडाळपस्वारी सुरू होऊन श्री देव गांगेश्र्वर, श्री देव रामेश्वर मंदिर येथे भेट देऊन देव मळा शेतीतून श्री देव ठाणेश्वर, श्री राजेश्वर, विठलादेवी तसेच भंडारवाडी येथे दर्शन भेट देऊन सायंकाळी श्री देव ठाणेश्वर मंदिर इथे मुक्काम. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी श्री ठाणेश्वर मंदिर मधून भटवाडी दर्शन, श्री जामदार खाना भेट, पाटवाडी दर्शन देऊन भेट देऊन सायंकाळी श्री ब्राम्हणदेव बांध (तळेवाडी) इथे मुक्काम.

बुधवार ११ फेब्रुवारी रोजी श्री ब्राम्हण देव बांध तळेवाडी येथून तळेवाडी पश्चिम दर्शन, श्री देवी कुलस्वामिनी भेट, पूर्व तळेवाडी दर्शन, श्री भैरव नाथ भेट, नळेकरवाडी येथे दर्शन भेट देऊन, सायंकाळी श्री ब्राम्हणदेव मंदिर (गडगेवाडी) इथे मुक्काम. गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी श्री ब्राम्हण देव, गडगेवाडी येथून, गडगेवाडी, कालावल, खांबलवाडी व सडयेवाडी दर्शन घेऊन सायंकाळी (सडये वाडी) इथे मुक्काम. शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सडयेवाडी येथून श्री भिकन्नाथ भेट, कामत बाग दर्शन, श्री राजेश्वर भेट, मळेवाडी, दुखंडेवाडी, घाडीवाडी, श्री गांगेश्र्वर, रामेश्वर भेट, देऊळवाडी दर्शन घेऊन श्री सातेरी देवी भेट घेऊन सायंकाळी श्री रवळनाथ मंदिर (मांड) येथे आगमन.

सर्व भाविक, भक्तांनी डाळप स्वारी (वायंगणी चतु:सीमा परिक्रमा) सोहळ्यात बहुसंख्येने उपस्थित राहून या दैविक सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बारापाच मानकरी, वतनदार, ग्रामस्थ वायंगणी यांनी केले आहे.

error: Content is protected !!