माध्यमिक विद्यामंदिर कनेडीची बारावी परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण

एकूण २२७ विद्यार्थी प्रविष्ट

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ, कोकण बोर्ड होणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि. १० फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,श्री तुकाराम शिवराम सावंत जूनियर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी सांगावे, ता. कणकवली या केंद्रावर सर्व तयारी पूर्ण झाली आहे , या परीक्षेसाठी एकूण २२७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. सदर केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुसज्ज करण्यात आलेली आहे. केंद्र संचालक म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक बयाजी बुराण, उपकेंद्र संचालक म्हणून प्रकाश बागुल काम पाहत आहेत.

ही परीक्षा १० फेब्रुवारी ते दि. १८ मार्च पर्यंत होणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त ,तणावमुक्त, व भयमुक्त वातावरण पार पाडण्यासाठी कोकण विभागाने भरारी पथके नेमली आहेत. त्यासह प्रत्येक जिल्हा प्रशासनाची भरारी पथके असणार आहेत. दक्षता पथके देखील गोपनीय पद्धतीने कार्यरत असतील.
सदर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सरस्वती मंदिर व लॅब इमारत- ब्लॉक नंबर ०१ ते ०७ (seat no- W008683 to W022622), दिव्यांग विद्यार्थी ब्लॉक नंबर-१० तर ऑफिस इमारत- ब्लॉक नंबर ०८ व ०९ (seat no-W022623 to W023705) अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल व तत्सम वस्तू बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर वेळीच उपस्थित रहावे. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ताणतणावविरहित परीक्षा द्यावी. परीक्षेबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांशी चर्चा करावी, असे आवाहन केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची ही परीक्षा गैरप्रकार व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी मंडळाने नियमावलीत काही बदल केले आहे. त्यानुसार यंदाची परीक्षा पार पडणार आहे.

error: Content is protected !!