वैभववाडीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज : उद्या सकाळी 10 वा. मतमोजणीला सुरुवात

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पार पडली असून आता सोमवारी दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वैभववाडी तहसील कार्यालय येथे होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

मतमोजणीसाठी प्रत्येकी 6 टेबल लावण्यात येणार असून सुरुवातीला टपाली मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ व पंचायत समिती मतदारसंघाची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दि. 7 फेब्रुवारी रोजी तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण 17 उमेदवारांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

error: Content is protected !!