“रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे काम कौतुकास्पद ….” – अरुण भंडारे डिस्ट्रिक गव्हर्नर

रोटरी च्या वतीने ५ महिलाना शिलाई मशीन वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण सारख्या ग्रामीण भागात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ खारेपाटण या संस्थेने आपले ठेवलेले रेकॉर्ड व गेल्या वर्षभरातील संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेले सामाजिक उपक्रम केलेले कार्य निश्चितच रोटरी साठी दिशादर्शक व गौरवास्पद असल्याचे भावपूर्ण उदगार सिंधुदुर्ग डिस्ट्रिक गव्हर्नर रोटरीयन अरुण भंडारे यांनी खारेपाटण येथे रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोटरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना करताना काढले.

रोटरी विश्वातील अत्यंत महत्वाची समजली जाणारी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिट आज रोटरी क्लब ऑफ खारेपाटण येथे संपन्न झाली. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो अरूण भंडारे,असिस्टंट गव्हर्नर रो.सचिन मदने, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो प्रणय तेली आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष रो दयानंद कोकाटे, सचिव रो अजय गुरसाळे, खजिनदार रो सारिका मेहेंद्रे आणि संपूर्ण टीमने अतिशय दमदार प्रोजेक्ट, जबरदस्त रेकाॅर्ड ठेवल्याबद्दल मान डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो अरूण भंडारे यांनी विशेष कौतुक करित रोटरीबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. या DG VISIT साठी रेकाॅर्ड तयार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे विशेष अभिनंदन आणि GSR रो संजय रावराणे, माजी अध्यक्ष रो प्रशांत गुळेकर, अध्यक्ष रो सचिन रावराणे व टिम यांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे यावेळी भंडारे यांनी संगीतले.

यावेळी महिला सबलीकरानाच्या दृष्टीने खारेपाटण पंचक्रोशीतील ५ गरजू महिलांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो अरूण भंडारे यांचे उपस्थितीत शिलाई मशिन्स वाटप करण्यात आले. यासाठी मेहनत घेणा-या सर्व रोटरी सदस्यांचेही यावेळी रोटरी च्या वतीने विशेष अभिनंद करण्यात आले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व रोटरीयन प्रवीण लोकरे, संचालक विजय देसाई, महेश कोळसुलकर, भाऊ राणे, संकेत लोकरे, सुबोध देसाई, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे,खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक व रोटरीयन संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, यशवंत रायबागकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!