आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक आरेकरवाडी येथील रहिवासी, सुप्रसिद्ध व्यापारी, गावचे माजी सरपंच जनार्दन त्रिंबककर यांचे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आरेकरवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळावू स्वभावामुळे ते प्रसिद्ध होते. सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, दोन मुलगे, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. व्यापारी सतिश आणि राजू त्रिंबककर यांचे ते वडील व विद्यमान सरपंच किशोर त्रिंबककर यांचे ते चुलते होते.
त्रिंबक गावचे माजी सरपंच जनार्दन त्रिंबककर यांचे निधन….!












