सुप्रसिद्ध गणेशमूर्तिकार शंकर गोसावी यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडीतील रहिवासी सुप्रसिद्ध गणेशमूर्तिकार शंकर धर्माजी गोसावी ( वय ८० वर्षे ) यांचे आज मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी पहाटे ६.०० वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

काळसे गावासह पंचक्रोशीमध्ये पर्यावरण पूरक माती पासून हाती गणेशमूर्ती बनविणारे उत्कृष्ट गणेश मूर्तिकार म्हणून त्यांची ख्याती होती. “मंगलमूर्ती आर्ट” चे मालक गणेश मूर्तिकार प्रदिप गोसावी यांचे ते वडील होते तर सेवानिवृत्त तहसीलदार शरद गोसावी आणि पत्रकार अमोल गोसावी यांचे ते काका होते.

error: Content is protected !!