चिंदर जत्रेचा वड येथे १२ फेब्रुवारीला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम….!

तिरंगी भजन बारीचा सामना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथील पुरातन जत्रेचा वड येथे गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजेने होणार असून, दुपारी १२ वाजता श्रींची आरती व तीर्थप्रसाद होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सुस्वर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

रात्री ९.३० वाजता भजनप्रेमी स्व. अनिल जयवंत हडकर व राजा बैल यांच्या स्मरणार्थ अनिकेत अनिल हडकर व स्वराज अनिकेत हडकर पुरस्कृत तिरंगी भजन बारी सामना रंगणार आहे. या तिरंगी भजन बारीत बुवा विजय (गुंडू) सावंत, बुवा संदीप लोके व बुवा संदीप पुजारे यांच्यात रंगतदार सामना होणार आहे. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!