अहिल्या प्रभाग संघ खारेपाटण च्या वतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

“विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासा बरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी” – प्राची ईसवलकर (जि.प.सदस्य खारेपाटण)

खारेपाटण (प्रतिनिधी) : “आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी शालेय अभ्यास क्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करावी. असे भावपूर्ण उदगार खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या नवनिर्वाचित सदस्या प्राची ईसवलकर यांनी अहिल्या प्रभाग संघ खारेपाटणच्या वतीने जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा कार्यक्रमात विद्यार्थी व पालकाना मार्गदर्शन करताना काढले. उमेद, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत खारेपाटण व तळेरे या विभागात आदर्शवत काम करणाऱ्या अहिल्या प्रभाग संघ खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे इयत्ता ५ वी शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा कार्यक्रम प्रभागाच्या अध्यक्षा सौ दीप्ती तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घघाटन खारेपाटण जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी खारेपाटण प्रभागातील १० शाळांमधील सुमारे ७२ शालेय विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाला नवनिर्वाचित खारेपाटण पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, कणकवली तालुका अभियान समन्वयक दक्षता पांजरी, खारेपाटण ग्रा.पं. सदस्य अस्ताली पवार,खारेपाटण केंद्र शा.व्य.समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर,तळेरे शा.व्य.स.अध्यक्ष रेवती तळेकर,उपाध्यक्ष अनुष्का गोसावी खारेपाटण केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, तळेरे केंद्रप्रमुख संजय पवार,प्रभाग समन्वयक अमोल गराडकर,खारेपाटण ग्राम संघाच्या अध्यक्षा मनाली होणाळे जागृती पोटले,चिंचावली – साक्षी भालेकर, वायंगणी – शमिका सुतार, नडगीवे – साक्षी आंबेरकर, कुरंगवणे – जान्हवी गोसावी, साळीस्ते -करुणा गुरव,वारगाव – केसरकर यांसह खारेपाटण प्रभागातील अंजली कुबल, आस्था पाटणकर CTC, ग्रामसखी,लिपिक व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी अहिल्या प्रभाग संघाच्या वतीने नवनिर्वाचित खारेपाटण जिल्हा परिषद सदस्या प्राची ईसवलकर व पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांचा प्रभागाच्या अध्यक्षा दीप्ती तळेकर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर खारेपाटण केंद्र शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सर्धेत तालुक्यात प्रथम आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर याचा प्रभाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभाग संघाच्या वतीने सहभागी सर्व शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केले. तर प्रास्ताविक निशा शेलार यांनी केले व सर्वांचे आभार वृषाली दर्पे यांनी मानले.यावेळी खारेपाटण प्रभागातील बचत गटाच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!