कु.अनुष्का गाडे हिची गोल्ड मेडल मिळवत राष्ट्रीय स्तरावर निवड
खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व अहिल्यानगर जिल्हा हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.तर याच हायस्कूलची विद्यार्थ्यांनी कु. अनुष्का ज्ञानेश्वर गाडे हिने या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविल्याने तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

हाफकिडो बॉक्सिंग स्पर्धा या नुकत्याच श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे दि.३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडल्या.या राज्यस्तरीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर जाणारी खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थ्यांनी कु. अनुष्का गाडे ही सिंधुदुर्ग मधील पहिली खेळाडू ठरली आहे.तर हापकिडो ही एक कोरियन मार्शल आर्ट असून ती लांब पल्ल्याच्या आणि जवळच्या लढाईच्या तंत्रांचा वापर या क्रीडा प्रकारात केला जातो.
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय हापकिडो बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीयस्तरावर भरारी घेतली आहे.यामध्ये खालील वयोगटातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

१)कु.अनुष्का ज्ञानेश्वर गाडे (गोल्ड मेडल – ४२ किलो वजन गट)
२) कु.अनुष्का संतोष धुवाळी (सिल्व्ह रमेडल – ४५ किलो वजन गट)
३) कु.रिया दीपक वाघरे (सिल्व्हर मेडल – ४८ किलो वजन गट )
४) कु.सानिया सतीश पवार (सिल्व्हर मेडल – ६० किलो वजन गट)
५) कु.सानिका टोपणा गावडे (सिल्वर मेडल – ५४ किलो वजन गट )
६) कु.तेजस्वी प्रवीण मिशाळ (तृतीय क्रमांक – ५१ किलो वजन गट)
७) कु.त्रिवेणी विशाल परब (तृतीय क्रमांक – ३९ किलो वजन गट)
८) कु.श्रावणी शिवाजी कानडे (तृतीय क्रमांक – ६३ किलो वजन गट )
९) अर्णव गणेश जामसंडेकर (सिल्वर मेडल – ४६ किलो वजन गट )
१०) अहमद रजा फैयाज पावसकर (सिल्वर मेडल – ६७ किलो वजन गट)
११) सोहम राजेंद्र पवार (तृतीय क्रमांक – ६१ किलो वजन गट )
१२) सम्मेद अजित उपाध्ये (तृतीय क्रमांक – ४९ किलो वजन गट )
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक पाडवी आणि भिसे, सहायक शिक्षिका सारिका महिंद्रे यांचे चांगले मार्गदर्शन लाभले.

दक्षिण आशिया टेकयान महासंघाचे महासचिव एड. राज वागदकर आणि जिल्हा हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय सानप यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे सचिव महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त,प्राचार्य संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.












