शिक्षकांच्या प्रश्नांबाबत विधानसभा सभागृहात व मंत्रिमंडळात आवाज उठवताना हा ज्ञानेश्वर म्हात्रे कधीच कमी पडणार नाही

संस्थाचालक संघटनेच्या वतीने आयोजित बैठकीत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन

कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संस्थाचालक व शिक्षक संघटनेच्या बैठकीला उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थाचालक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक पतपेढी ओरस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट दिली. यावेळी संस्थाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील समाधानकारक उत्तरे देत त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. जिल्हातील पटसंख्येचा निकष शिथिल करून सिंधुदुर्ग व अन्य कोकणातील शाळांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आपण मंत्रीमंडळात व अधिवेशनात सभागृहात वेळोवेळी आवाज उठविला आहे. सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री नितेश राणे हे देखील या बाबत माझ्यासोबत असुन सकारात्मक भुमिकेत आहेत. तरी आपण देखील सर्व संघटनांनी माझ्या सोबत एकत्र या आपल्या सर्वांच्या एकजुटीने हा प्रश्न लवकरच निकाली निघेल अशी आशा देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच गेल्या दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सोलर, कम्प्युटर, प्रिंटर उपलब्ध करून देत दोन कोटी रूपयांचा निधी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण दिल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी हा ज्ञानेश्वर म्हात्रे कधीही मागे हटणार नाही. शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक आमदार अशा तिहेरी भूमिकेत वावरताना केवळ शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्याच्या दृष्टीने काम करत असताना प्रसिद्धी ला महत्त्व दिले नाही परंतु गेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बचाव आंदोलनात उपस्थित नाही म्हणून शिक्षक आमदार आहेत कुठे ? असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला. कदाचीत गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांची प्रसिद्धी करण्यात आम्ही कमी पडलो असं म्हणतं अप्रत्यक्षपणे त्यांनी उपस्थितीत विरोधकांना टोला लगावला.

यावेळी संस्थाचालक सिंधुदुर्ग संघटनेचे अध्यक्ष सामंत, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव घावरे, शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष वेतोरेकर, अध्यक्ष आडेलकर, अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे, संदीप कदम, शिक्षकेत्तर संघटना अनिल राणे, शिव छत्रपती शिक्षक संघटना सुभाष खरात तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!