शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणाधिकारी यांच्या दालनात सभा संपन्न
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना या दरम्यान विविध शिक्षकांना प्रलंबित प्रश्नांबाबत अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांनी भेट घेऊन आपल्या शिक्षण विभागातील समस्यांचा पाढाच वाचला. यावर तत्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात शिक्षण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सदर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या सर्व प्रतिनिधींच्या समवेत शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या सोबत बैठक घडवून आणली व विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षण विभागास खडेबोल सुनावले. व प्रलंबित सर्व कामांबाबत तातडीने निर्णय घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांचे काम करावे अशा सूचना दिल्या. यावेळी अनुकंपा मान्यता, थकीत देयके, मेडिकल देयके, वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड वेतनश्रेणी आशा सर्व प्रकरणांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. व येत्या पंधरा दिवसात सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी वर्गास सुचना दिल्या. शिवाय यावेळी अनुकंपा व अल्पसंख्याक शाळा वैयक्तिक मान्यता तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिवडाव हायस्कूल चे कनिष्ठ लिपिक राहुल वाळके यांची लिपिक पदाची अनुकंपा नियुक्ती, बागवे हायस्कूल मसुरे च्या विशाखा जाधव यांची सहाय्यक शिक्षक वैयक्तिक मान्यता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते त्यांना या बैठकीदरम्यान वितरित करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तर्फे, कुसगावकर, अजय शिंदे, तोडणकर, वाळके, शिक्षक भारती संघटनेचे वेतोरेकर, आडेलकर, आकाश तांबे, सुभाष खरात, देवेंद्र देवरुखकर, योगेश चव्हाण, शिक्षक चोरगे, शिक्षक तकिलदार व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.












