नवनिर्वाचित जि प सदस्य मनोज रावराणे, पं स सदस्य मानसी मराठे यांचा घोणसरी चर्च मध्ये सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे आणि लोरे पं स मतदारसंघातून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी झालेल्या पं स सदस्य मानसी मराठे यांचा घोणसरी येथील सेंट सेबेस्टिन चॅपेल येथे फादर मनवेल फर्नांडिस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनोज रावराणे यांनी याआधी घोणसरी गावचे प्रतिनिधित्व करत कणकवली पंचायत समिती सभापतीपदी उत्कृष्ट काम केले आहे.तसेच मानसी मराठे ह्या घोणसरी गावच्या रहिवासी असून त्यांनी लोरे पं स मतदारसंघातून प्रथमच निवडणूक लढवताना रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. या विजयाबद्दल मनोज रावराणे आणि मानसी मराठे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी अँथोनी पिंटो , वेलेरियन पिंटो सेलिस्टिन रईस ,डॅनी फर्नांडिस, जेरोन आदीसह ख्रिस्ती बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!