स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन; १०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
बांदा (प्रतिनिधी) : येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं 1 येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तीन शालेय गटांसह खुल्या गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत 100 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
दुसरी ते चौथी गट (प्रथम तीन क्रमांक) सार्थक घनश्याम वालावलकर
(जिल्हा परिषद शाळा नं 4 सावंतवाडी), दक्ष तुषार वालावलकर (जिल्हा परिषद शाळा नं 2 सावंतवाडी), संपदा संदेश पालव (जिल्हा परिषद इन्सुली शाळा नं 4) तर तनिष्का तुषार गोरड (जिल्हा परिषद शाळा मोरगाव) व सार्थक विनोद राणे (जिल्हा परिषद इन्सुली शाळा नं 10) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
पाचवी ते आठवी गट सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर (पी एम जि. प. शाळा बांदा नं 1), दुर्वा दत्ताराम नाटेकर (दिव्य ज्योती स्कूल बांदा), प्रणिता गोविंद सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली). तर मैथिली मनोहर सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली) व सानवी सचिन देसाई (खेमराज हायस्कूल बांदा) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.नववी ते बारावी गट – श्रावणी राजन आरावंदेकर (जि.डी. नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे), मृदुला नाना सावंत (दिव्य ज्योती स्कूल बांदा), श्रावणी शंकर कोठावळे (आर पी डी हायस्कूल सावंतवाडी) तर युक्ता प्रसाद सापळे (एस पी के सावंतवाडी) व आर्या शंकर नाईक (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
खुला गट- नेत्रा विनोद राणे (इन्सुली), प्राची गोविंद सावंत (इन्सुली), शुभेच्छा संदीप सावंत (बांदा) तर सिद्धी अश्विनीकुमार वराडकर (पाडलोस) व अदिती सूर्यकांत जाधव (सावंतवाडी) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण एस व्ही नाईक, चंद्रकांत सावंत, सुनील नातू, प्रा. प्रणाली मयेकर यांनी केले. तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी मुख्याध्यापक शांताराम असनकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, भूषण सावंत, संकेत वेंगुर्लेकर, अनुप बांदेकर, नारायण बांदेकर, शुभम बांदेकर, तनिष मेस्त्री,अक्षय मयेकर, वैदेही वाडकर, स्वाती पाटील रोट्रॅकचे अध्यक्ष रोहन कुबडे, शिवम गावडे, नेहा निगुडकर, रुपेश सावंत, दिया गायतोंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घारपी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जे डी पाटील यांनी केले. आभार भूषण सावंत यांनी मानले.












