बांदिवडे ग्रामस्थ संघ स्थानिक समिती यांचे आयोजन
२१ रक्तदात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान
आचरा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बांदिवडे ग्रामस्थ संघ स्थानिक समिती यांच्या वतीने रविवार १५ फेब्रुवारी रोजी बांदिवडे जिल्हा परिषद शाळा नं २ येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
रक्तदान शिबिराला संदेश पवार, कमलेश प्रभू, खेमजी घाडीगांवकर, हर्षल प्रभू, अमित जोशी, जगदीश मुळे, भावेश आईर, दिनेश परब, उमेश परब, शैलेश राणे, सौ. अंजली घाडीगांवकर, सुनिल घाडी, सागर आरेकर, साई परब, संदिप आईर, शुभम घाडी, सौ. अनुष्का परब, अजय घाडीगांवकर, मंगेश(सोम्या) परब, दिपक घाडी, विकास घाडी या २१ रक्तदात्यांनी रक्ताचे पुण्यदान केले तर प्रविण झोरे, सौ. मयुरी राणे सौ. स्वाती आईर, सौ. वैष्णवी घाडी यांनी सहभाग दर्शवला.
यावेळी ग्रामस्थ संघाचे अध्यक्ष आनंद परब, वैद्यकीय अधिकारी डॉ मोहित दानाळ, नर्सिंग ऑफिसर सुमंगल बुगडे, समाजसेवा अधिक्षक भूषण मळेकर, रक्तपेढी तंत्रज्ञ मयुरी शिंदे, रक्तपेढी सहाय्यक ऋतुजा हरमलकर, पोलीस पाटील संदेश पवार, बांदिवडे विकास सोसायटीचे चेअरमन प्रफुल्ल प्रभू, माजी उपसरपंच किरण पवार, संघाचे उपाध्यक्ष विलास परब, सचिव उदय सावंत, खजिनदार अजय घाडीगांवकर, शंकर आईर, सतिश आईर, दिनेश परब, प्रशांत परब, रमेश मेस्त्री, सुनिल घाडी, विकास घाडी, संदिप घाडीगांवकर, सुनिल घाडीगांवकर, रामचंद्र माळकर, ऋषिकेश जाधव, गणेश मांजरेकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश परब यांनी तर आभार आनंद परब यांनी मानले.












