छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी कविराज भूषणांचे काव्य महत्त्वाचे – इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर

किल्ले भगवंतगडवर छत्रपती शिवरायांचा जयघोष

चिंदर सेवा संघ आयोजित शिवजयंती सोहळा

आचरा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तो समकालीन लेखक काय म्हणतात यातून समजून घेतला पाहिजे. कवी भूषण हा महाराजांच्या समकालीन त्यांचा राजदरबारी कवी होता. यामुळे महाराजांचा खरा इतिहास समजायला कवी भूषण यांचेच काव्य उपयोगी पडते, असे मत मराठी शिवभूषण पुस्तकाचे लेखक, इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांनी चिंदर भगवंतगड किल्ल्यावर शिवजयंती उत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.

ऐतिहासिक किल्ले भगवंतगड येथे चिंदर सेवा संघ, शिवप्रेमी यांच्यावतीने आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जय घोषाने किल्ला परिसर दणाणून गेला. श्री देव सिध्देश्वर आणि शिवप्रतीमेला जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर गुरुजी, चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, रत्नाकर कोळंबकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजन्मोत्सव, महिला वर्गाचे म्हटलेला पाळणा तसेच चिंदर अपराजवाडी, चिंदर बाजार, पडेकाप, कुंभारवाडी, चिंदर नं १, गावडेवाडी, पालकरवाडी, भटवाडी, तेरईवाडी, लब्देवाडी, सडेवाडी या चिंदर गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट सादरीकरणे केली. श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी व भटवाडी शाळा यांनी सादर केलेला शिवराज्याभिषेक सोहळा, दिंडी, आशिष कोरगांवकर आणि सहकारी यांनी सादर केलेला पोवाडा तर वरद जोशी आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेले मर्दानी खेळ यांनी शिवकालीन वातावरणाचा निर्मिती करत कार्यक्रमात रंगत आणली. लावण्या दत्तदास, आराध्या घागरे, गौरव दत्तदास, किजंल परब, वैखरी केळकर, रिया कोकरे यांनी वैयक्तिक सादरीकरणे केली. कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत आपल्या जिवनातील अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर, जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर गुरुजी यांचा चिंदर सेवा संघाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन सह्यदय सत्कार करण्यात आला. तसेच माजी केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, चिंदर पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, देवस्थान चालू वहिवाटदार राजेंद्र पाताडे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, लक्ष्मण पाताडे, संदिप परब, रविंद्र गोसावी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तुर्या द गृप ऑफ आर्ट्स व कला शिक्षक गणेश अपराज यांच्यावतीने सर्व शाळांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, सरपंच सौ. स्वरा पालकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, जान्हवी घाडी, खजिनदार गणेश गोगटे, सचिव सिध्देश गोलतकर, भूषण दत्तदास, सहसचिव आशिष कोरगांवकर, रोहन वराडकर, शंकर पालकर, मारुती हडकर, अजित साटम, संतोष अपराज, निशांत पारकर, पिंट्या दळवी, भाई तावडे, रावजी तावडे, सागर अपराज, लक्ष्मण पाताडे, रवि पवार, विनायक मसुरकर, संतोष पाताडे, सचिन जाधव, सिद्धेश मेस्त्री, अरुण लब्दे, अजित साटम, रोशन माडये, गुणवंत भोगले, बाब्या माळकर, संदीप सावंत, चिन्मय मुळे, प्रिया पालकर, बाबा मेस्त्री, दादा अपराज, सर्वेश अपराज, रोहित पाटील, सोनाली माळगांवकर, चिन्मयी पाताडे, योजना माळगांवकर, सदा बुवा गोसावी, रविंद्र गोसावी, सचिन आचरेकर, सखाराम गोसावी, विवेक परब, राजेंद्र प्रसाद गाड, सचिन तवटे, निशिगंधा वझे, केंद्र प्रमुख शितल माडये, संजय जाधव, संतोष राठोड, मैना कारंडे, उज्वला पवार, पूजा विभूते, कैलास काळे, अरुण आडे, शुभांगी खोत, स्मिता जोशी, अशोक घोलप, नेहा कुबल आदी बहुसंख्य शिवप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार प्रास्ताविक कु. मिताली आचरेकर हिने तर सुत्रसंचालन आणि आभार सिध्देश गोलतकर यांनी मानले.

error: Content is protected !!