सहभागी होत लाभ घेण्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत, महिला बालकल्याण विभाग मार्फत कणकवली नगरपंचायत हद्दीतील महिलांकरीता मोफत करवंटी हस्तकला प्रशिषण कार्यक्रम – तीन दिवस (पूर्ण वेळ) व कोकेडामा प्रशिषण कार्यक्रम एक दिवस (पूर्ण वेळ) असे दोन वेगवेगळे प्रशिषण कार्यक्रम आयोजित केले असून 18 ते 55 वयोगटातील कणकवली शहरातील रहिवासी असलेल्या युवती / महिला या प्रशिक्षण कार्यक्रमचा लाभ घेऊ शकतात. प्रशिक्षण दरम्यान दिलेल्या वेळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 25/02/2026 असून सदर अर्ज दि. 18/02/2026 ते दि. 25/02/2026 या कालावधीत नगरपंचायत कार्यालय, DJAY-S कक्ष, तळ मजला येथे उपलब्ध आहेत. तरी शहरातील जास्तीत जास्त युवती / महिलानी या प्रशिक्षण कार्यक्रमचा लाभ घ्यावा व स्वयं रोजगार सुरु करावा असे आवाहन कणकवली नगरपंचायत कडून करण्यात आले आहे.












