आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने मुंबई वडाळा येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आचरा येथील त्रिनेत्र मित्र मंडळ संचलित मसल क्रिएशन फिटनेस या जिमचे सदस्य अशेष पेडणेकर, प्रज्ञा पेडणेकर, चेतना चव्हाण यांनी ब्रांझ मेडल मिळवून आचऱ्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्वल केले आहे.
महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशनने 21 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई वडाळा येथे पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आचऱ्याच्या मसल क्रिएशन फिटनेस या जिमच्या आशिष पेडणेकर, प्रज्ञा पेडणेकर, चेतन चव्हाण, प्रणित धुमडे, केदार चव्हाण यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी आशिष पेडणेकर, प्रज्ञा पेडणेकर आणि चेतना चव्हाण यांनी ब्रांझ मेडल मिळविले. आचरा व्यापारी संघटनेचे सदस्य असलेल्या आशिष पेडणेकर आणि सर्व विजेत्यांचे व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांसह सर्व पदाधिकारी सदस्य तसेच आचरा ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.












