डॉक्टर बिरमोळे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल, कणकवली / सरस्वती मेडिकल फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री सत्यविजय जाधव मित्र मंडळ कणकवली आयोजित

आरोग्य तपासणी शिबिर व प्रदर्शन साक्षरता अभियान

कणकवली (प्रतिनिधी) : सध्याच्या या धावपळीच्या जीवनात महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. लहान किशोरवयीन मुली असो वा तरुण वृद्ध महिला असो. पुरूष जितका समाजाचा खंबीर आधार आहे तशाच महिला सुद्धा समाजाचा खंबीर आधार आहे. महिला सक्षमीकरण ही सध्याच्या काळाची गरज आहे म्हणून तुमच्या आरोग्यासाठी, सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी आम्ही आयोजित करत आहोत एक विशेष शिबिर जे तुम्हा महिलांमध्ये कमी असलेले घटक तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतील तेही मोफत, कोणत्याही प्रकारची फी न घेता

🩺🏥 शिबिराची वैशिष्ट्ये :-
1️⃣ मोफत आरोग्य तपासणी : (हिमोग्लोबिन, मधुमेह, कर्करोग (कॅन्सर), रक्तदाब, रजोनिवृत्ती, प्रसूती आणि वंध्यत्व निवारण तपासणी)
2️⃣ स्वसंरक्षण प्रशिक्षण (Self Defense) : स्वतःचे रक्षण करण्याचे तंत्र
3️⃣ कायदेशीर मार्गदर्शन : महिला हक्क व कायद्यांची माहिती
4️⃣ कौशल्य विकास व उद्योजकता : घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन
5️⃣ योगा व मानसिक स्वास्थ्य : तणावमुक्त जीवनासाठी सत्र

📅 दिनांक : शनिवारी, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२६
⏰ वेळ :
सकाळी ठीक नऊ वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत
📍 ठिकाण :
डॉक्टर बिरमोळे यांचे गुरुकृपा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल, कणकवली पोलीस स्टेशनच्या विरुद्ध बाजूला, कलमठ, तालूका – कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग ४१६६०२

टीप : शिबिर मोफत असून सर्वांसाठी चहा-नाश्त्याची सोय उपलब्ध आहे.
सर्व महिलांनी येताना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, आपली औषधे चालू असतील तर गोळ्यांची पाकिटे, लिक्वीड औषधे चालू असतील तर लिक्वीड औषध बाटली येताना सोबत घेऊन येणे.
आपल्या आरोग्यासाठी आणि आत्मविश्वासासाठी नक्की उपस्थित राहा.

📞☎️📱 अधिक माहितीसाठी या दुरध्वनी संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा :-
1️⃣ श्री. सत्यविजय जाधव – 7058595990 / 9423806075
2️⃣ श्री. अशोक घाडीगावकर – 8275628606
3️⃣ श्री. विकास गुरव – 7972237402
4️⃣ सौ. प्राची प्रविण परब – 9324591610
5️⃣ सौ. मोहिनी जाधव – +919421784807
6️⃣ श्री. आनंद जाधव – 7744924538

मग वाट कसली पाहताय चला, एकत्र येऊया, महिला सक्षमीकरणाचा संदेश पसरवूया. आमच्या विशेष शिबिरात आपले स्वागत आहे.

सशक्त नारी, सशक्त समाज; चला घडवूया प्रगतीचा नवा साज……….

error: Content is protected !!