वेंगुर्ला (प्रतिनिधी) : होडावडे येथील रहिवाशी लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (७९) यांचे शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांच्या त्या मातोश्री होत. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कुडाळकर कुटुंबीयांचे सात्वन केले. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांना मातृशोक











