कणकवली नगरपंचायतचा २०४६ सालापर्यंतचा प्रारूप आराखडा जाहीर

२७ मार्च पर्यंत हरकत नोंदवता येणार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचा पुढील २० वर्षांचा विकास आराखडा कणकवली नगरपंचायतमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रारूप आराखड्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. सूचना व हरकती सादर करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या आराखड्याच्या प्रस्तावित आरक्षणाच्या मुद्द्यावरून येत्या काळात कणकवली शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेच काही आरक्षणे ही नव्याने टाकली जाण्याची शक्यता असल्याने आज पासून कणकवली नगरपंचायत मध्ये अनेकांची प्रसिद्ध केलेला प्रारूप आराखडा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही होणार आहे. सूचना व हरकती देण्याकरिता सहाय्यक संचालक नगर रचना विभाग यांना प्राधिकृत करण्यात आले असून नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक नाजनीन मोमिन यांनी हा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. २७ मार्चपर्यंत या प्रारूप आराखड्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. नगर रचना विभाग सिंधुदुर्ग व कणकवली नगरपंचायत या ठिकाणी या सूचना व हरकती लेखी स्वरुपात देता येणार आहेत.

error: Content is protected !!