तारीख ठरली ! पं स सभापती 9 मार्च तर जि प अध्यक्ष , उपाध्यक्ष निवड 16 मार्च रोजी

तब्बल 4 वर्षांनी पं स आणि जिल्हा परिषद ला मिळणार कारभारी

सिंधुदुर्ग नगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक दिनांक 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता तर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जि.प. व पंचायत समिती निवडणूक निकाल 9 फेब्रुवारीला लागल्यानंतर पदाधिकारी निवड कधी होणार याची प्रतीक्षा होती त्या निवडीची आता तारीख जाहीर झाली आहे.

error: Content is protected !!