तेजस कदम यांचे पखवाज विशारद परीक्षेत सुयश

कणकवली : कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र तेजस विठ्ठल कदम यांनी पखवाज वादनात विशारद पदवी संपादन कतर उज्ज्वल यश संपादन केले आहे. गेल्या ९ वर्षांपासून पखवाज वादनाची सातत्यपूर्ण साधना करत असलेल्या तेजस यांनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांच्या बळावर हे यश मिळवले. तेजस कदम यांना पखवाज अलंकार, गुरुवर्य महेश विठ्ठल सावंत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताल-लय, परण, लयकारी, साथसंगत आणि सोलो वादन यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी ही पदवी प्राप्त केली.

या यशामागे त्यांचे नातेवाईक मारुती गावडे यांचा विशेष वाटा असून, सुरुवातीपासूनच त्यांनी प्रोत्साहन, आर्थिक व मानसिक पाठबळ दिले. तसेच आई-वडील आणि कुटुंबीयांचा संपूर्ण आशीर्वाद, आशीर्वाद आणि विश्वास यामुळेच हा प्रवास यशस्वी झाल्याची भावना तेजस यांनी व्यक्त केली. डिसेंबर २०२५ मध्ये पखवाज विशारदची परीक्षा कुडाळ येथे संपन्न झाली होती. या परिक्षेचा निकाल २७ जानेवारी २०२६ रोजी लागला आहे. याबाबत बोलताना तेजस कदम म्हणाले, “९ वर्षांच्या साधनेनंतर 88 % गुण मिळवून उत्तीर्ण होऊन विशारद पदवी मिळाल्याचा मला अत्यंत आनंद आहे. पखवाज ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा वारसा आहे. पुढेही अधिक साधना करून ही कला जपण्याचा आणि इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न राहील.” या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!