पोईप नाभिक संघटनेच्या वतीने पं स सदस्य प्रज्ञा चव्हाण यांचा सत्कार
पोईप (प्रतिनिधी) : मालवण पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्या प्रज्ञा भाऊ चव्हाण यांचा पोईप नाभिक समाजाच्या वतीने पोईप येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रज्ञा चव्हाण म्हणाल्या की आपण मला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल आपले आभार तसेच आपण माझ्या आज सत्कार केला त्या सत्कारास मी भारावून गेली आहे पोईप नाभिक समाजाच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध आहे
त्यावेळी उपस्थित मालवण तालुका अध्यक्ष, संतसेना सहकारी पतसंस्था चेअरमन भाऊ चव्हाण, पोईप गावचे माजी सरपंच श्री सुर्यकांत चव्हाण,आदर्श नाभिक कार्यकर्ते व माजी विभाग प्रमुख विकास चव्हाण, माजी विभाग प्रमुख हेमंत चव्हाण, त्याच प्रमाणे समाज्याचे जेष्ठ कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या












