खारेपाटण येथे केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ…

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गुरववाडी येथील श्री केदारेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “एक गाव एक संघ” भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नुकताच खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर व पंचायत समिती सदस्य गुरूप्रसाद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. खारेपाटण येथील श्री देव केदारेश्वर मंदिराच्या भव्य मैदानावर संपन्न झालेल्या या क्रिकेट स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार,उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून क्रिकेट स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, मंगेश गुरव, महेश कोळसुलकर, ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई, किरण कर्ले, खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, खारेपाटण ग्रामस्थ श्याम कोळसुलकर, संतोष रोडी, मंडळाचे कार्यकर्ते भाऊ राणे, अमोल गुरव, मनोज गुरव, उमेश गुरव, अजित गुरव, अनिकेत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंडळाचे वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

तर मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल गुरव यांच्या हस्ते श्रीफळ फोडून क्रिकेट मैदानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते फित कापून या क्रिकेट स्पर्धेला सुरवार करण्यात आली.दि.२७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ अशी सलग तीन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेकरिता अंतिम विजेता संघाला रोख रुपये २६,०२६ / – व आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघाला रोख रुपये १६,०१६ /- व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात येणार आहे. या बरोबरच उत्कृष्ट गोलंदाज,फलंदाज,व मालिकांवर यांना देखील बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी रवींद्र जठार व संतोष पाटणकर यांनी केदारेश्वर मित्र मंडळ यांनी भरविलेल्या क्रिकेट स्पर्धेला सलग ५ वर्षे सातत्य राखत नीटनेटकी व सुंदर आयोजन करून स्पर्धा यशस्वी पार पाडत असल्याबद्दल या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष लोकरे यांनी केले.

error: Content is protected !!