जागतिक महिला दिनानिमित्त पदर प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठान मार्फत महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन लक्ष्मी विष्णू हॉल कणकवली येथे करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 7 मार्च रोजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये महिलांनी पालक आणि कोथिंबीर यापासून पदार्थ घरी बनवून सायंकाळी 4.00 वाजता लक्ष्मी विष्णू हाॅलमध्ये घेऊन यायचे आहेत. तसेच फनी गेम्स घेण्यात येणार आहेत. तसेच मुली आणि स्त्रिया यांच्या सुरक्षिततेची माहिती देण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशक कावेरी कासरलकर या येणार आहेत.

रविवार दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 4.00 वाजता महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये अश्विनी फॅशन डिझायनिंग यांचा फॅशन शो, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, एकपात्री अभिनय, ग्रुप डान्स घेण्यात येणार आहेत. तसेच कणकवली शहरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचा गौरव करण्यात येणार आहे.

पाककलेसाठी आपण दिशा अंधारी 9422997667 आणि सांस्कृतिक कार्यक्रम साठी प्रियाली कोदे 9420524203 यांच्याशी संपर्क साधावा. भरघोस बक्षिसांसह 10 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. दैनंदिन धावपळ आणि धकाधकीच्या जीवनातून आनंद घेण्यासाठी आणि महिला दिन उत्साहाने साजरा करण्यासाठी सर्व महिला वर्गाने लक्ष्मी विष्णू हाॅलमध्ये नक्की या असे आवाहन पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी केले आहे.

error: Content is protected !!