पखवाज विशारद तेजस कदम यांचा स्वाभिमान प्रतिष्ठान, अचित कदम मित्रमंडळाकडून सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : पखवाज विशारद ही पदवी प्राप्त करून वरवडे गावचे सुपुत्र तेजस विठ्ठल कदम यांनी सुयश प्राप्त केले आहे. पखवाज वादनात विशारद झालेल्या तेजस यांनी कला क्षेत्रात आपल्या कलेची छाप पाडावी. उत्तमोत्तम कार्यक्रमांच्या माध्यमातून कलेची सेवा करत आपल्या कलेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात नावलौकिक कमवावा असे प्रतिपादन युवा उद्योजक तथा अचित कदम मित्रमंडळाचे अध्यक्ष अचित कदम यांनी केले. वरवडे गावचे सुपुत्र तेजस विठ्ठल कदम यांनी 9 वर्षांच्या अथक साधनेनंतर पखवाज विशारद ही पदवी प्राप्त केल्याबद्दल स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे आणि अचित कदम मित्रमंडळाच्या वतीने कान्हा मालंडकर आणि अचित कदम यांच्या हस्ते तेजस कदम यांच्या निवासस्थानी तेजस यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना तेजस कदम म्हणाले की, स्वाभिमान प्रतिष्ठान आणि अचित कदम मित्रमंडळाकडून झालेला सत्कार मला उर्जादायी आहे. माझे गुरू, आईवडील, आणि कुटुंबियांच्या आशीर्वादामुळे हे यश प्राप्त करता आले. यावेळी सुभाष मालांडकर, आनंद घाडी, सोहेल खान, आनंद बांदल, मारुती गावडे, संदेश सावंत, संदेश चिंदरकर, विट्टल कदम, मंदार मेस्त्री, पंकज मेस्त्री, ओंकार कदम, सागर गावडे, प्रथमेश बावकर, रितेश बावकर, राजा बावकर, रोहन बावकर, साई मालांडकर आदी उपस्थित होते.












