कणकवली नगर पंचायतच्या प्रारूप आराखड्यावर हरकतींसाठी मुदतवाढीची मागणी

सीटी सर्व्हे नंबर व भू-अभिलेख कार्यालयाच्या संपामुळे जमीनमालकांमध्ये गोंधळ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगर पंचायत यांनी प्रारुप आराखडा प्रसिद्ध करुन आपल्या कार्यालयात व नगरपंचायत कार्यालयात प्रारुप आराखडा नकाशे देऊन नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहेत. सदर आराखड्यात रस्त्यांबरोबर विविध आरक्षणे टाकलेली असून काही जमीन मालकांना सीटी सर्व्हे नंबर कळत नसल्याने जमीन मालकांकडे सातबारा असलेल्या जमीन मालकांचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे हरकतींसाठी 30 दिवसांपेक्षा मुदत वाढ मिळावी, अशी मागणी माजी आ. परशुराम उपरकर यांनी नगररचना विभाग संचालकांना पत्र पाठवून केली आहे.

नगररचना विभागाच्या संचालकांना दिलेल्या पत्रात, कणकवली शहरातील सर्व प्रारुप आराखड्यामध्ये सीटी सर्व्हे नंबर हे सर्व्हे नंबरमध्ये काही ठिकाणी आराखड्यामध्ये प्रसिद्ध केलेले आहे. त्यावरती हरकर्तीना ३० दिवसांची मुदत देऊन दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी पर्यंत हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. हरकती घेण्याकरीता बहुतांशी जमिनधारकांना सिटी सर्व्हे नंबर काय आहे, हे माहीत नाही व सध्या भूमी अभिलेख कार्यालयाचा संप असल्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडून सीटीसव्हे नंबरचे रेकॉर्ड देणे बंद असल्याने सीटी सर्व्हे नंबर व प्रॉपर्टी कार्ड व नकाशा उपलब्ध होत नसल्याने जनता व जमिन मालक यांची अडचण निर्माण झालेली आहे. हरकती घेण्याकरीता सीटीसव्र्व्हे नंबरची प्रॉपर्टी कार्ड व नकाशा व अन्य काही पुराव्या मिळण्याकरीता भूमी अभिलेख कार्यालयाचा संप असल्याने तो संप मिटल्यानंतर पुढील १ महिन्याचा अवधी देऊन हरकती सूचना घेण्याकरीता मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!