नव्या उमेदीने काम करण्याचा कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा निर्धार

मा. आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न

निवडणुक लढलेल्या उमेदवारांचा वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार

पैसे घेऊन विकल्या गेलेल्या उमेदवारांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याचे सर्वानुमते निश्चित

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांची बैठक आज माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली विजय भवन येथे संपन्न झाली. यावेळी विभागवार बैठका घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून नव्या उमेदीने काम करण्याचा या बैठकीत निर्धार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जे उमेदवार लढले, संघर्ष केला त्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच लाखो रुपये घेऊन विकल्या गेलेल्या आणि निवडणूक बिनविरोध केलेल्या उमेदवारांची शिवसेना पक्षातून कायमची हकालपट्टी करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. कणकवली विधानसभेच्या मागील दोन्ही निवडणुकीत ज्यांच्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी काम केले त्यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणूकित पूर्णतः दुर्लक्ष केले. काहींनी सुरुवातीपासून जि. प. निवडणूकीबाबत नकारात्मक भूमिका ठेऊन पक्षांतर केले. त्याबद्दल कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी वैभव नाईक म्हणाले, विरोधात लढताना अनेक अडचणी येत असतात मात्र त्या अडचणींवर मात करून आपण संघर्ष केला पाहिजे. ज्यांना आजपर्यंत आम्ही विरोध केला त्यांच्या सोबत आम्ही जाणार नाही. शिवसेना पक्षातूनच कार्यकर्ते आणि जनतेसाठी काम करत राहणार आहे. प्रत्येकाचे सत्ता हेच ध्येय असता कामा नये. जनतेने आपल्याला विरोधकाची भूमिका दिली आहे. ती आपण ठामपणे पार पाडुया. आज पक्षामुळेच आपल्याला महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने जोमाने काम करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवावा. त्यासाठी मी आपल्या सदैव पाठीशी आहे असे वैभव नाईक यांनी सांगितले. याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनीही पक्ष संघटना वाढीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, तालुका संघटक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयू धुमाळे, संदीप कदम, ॲड. हर्षद गावडे, तेजस राणे, धीरज मेस्त्री, गीतेश कडू, विलास गुडेकर, बबली राणे, माधवी दळवी, प्रतीक्षा साटम, रोहिणी पिळणकर, संजना कोलते, गुरु पेडणेकर, प्रवीण सावंत, महादेव राठवड, इमाम नावलेकर, आदित्य महाडिक, बाळा राऊत, सुरेश मेस्त्री, हनुमंत म्हसकर, तात्या निकम, सुशील कोरगावकर, रवींद्र खांदारे, मनोहर मालंडकर, वेदांत साटम, जगन्नाथ आजगावकर, महेश राणे, निलेश परब, संतोष मुणगेकर, संतोष राणे, प्रमोद सावंत, सचिन लोके, स्वप्नील मराठे, प्रकाश मेस्त्री, चेतन पाटील, किरण हुन्नरे, अविनाश सावंत, दशरथ शिंदे, विनोद परब आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!