कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित विविध स्पर्धा
आचरा (प्रतिनिधी) : वाचन कला विकास समिती त्रिंबक संचलित गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी रंगभरण स्पर्धा, बडबड गीत स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आणि पाठांतर स्पर्धा (छत्रपती शिवाजी महाराज चरित्र) अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये त्रिंबक गावातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
१) स्पर्धेमध्ये रंगभरण स्पर्धा :
प्रथम क्रमांक – भावेश संतोष घाडीगावकर
द्वितीय क्रमांक – मयूर बाळकृष्ण बाणे
तृतीय क्रमांक – कृतार्थ रामचंद्र नाईक
उत्तेजनार्थ – दिया दिलीप घाडीगावकर
२) बडबड गीत स्पर्धा :
प्रथम क्रमांक – सानवी विवेक जाधव
द्वितीय क्रमांक – भावेश संतोष घाडीगावकर
तृतीय क्रमांक – कृतार्थ रामचंद्र नाईक
उत्तेजनार्थ – महेंद्र मंगेश सावंत-भोसले
३) हस्ताक्षर स्पर्धा :
प्रथम क्रमांक – गौरी गौतम वाळवे
द्वितीय क्रमांक – भाविका दिलीप घाडीगावकर
तृतीय क्रमांक – चिंतामणी जितेंद्र घाडी
उत्तेजनार्थ – कार्तिक प्रशांत घाडीगावकर
४) पाठांतर स्पर्धा (शिवाजी महाराज चरित्र) :
प्रथम क्रमांक – गौरी गौतम वाळवे
द्वितीय क्रमांक – भाविका दिलीप घाडीगावकर
तृतीय क्रमांक – स्वरा संदीप घाडीगावकर
उत्तेजनार्थ – प्रथम प्रवीण बागवे
स्पर्धेचे परीक्षण सुप्रिया सकपाळ, वर्षा विवेक जाधव, शैलेश वायंगणकर, विवेक जाधव व सुरेंद्र सकपाळ यांनी केले. स्पर्धेला मार्गदर्शन करताना संदीप नलावडे यांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले व अशा छोट्या-छोट्या स्पर्धामधूनच मुलांचा आत्मविश्वास वाढतो असे वाचनालयाचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी मुलांना एक संस्कारमय बोध कथा सांगितली. स्पर्धेचे आभार कार्यवाह प्रशांत मेहेंदळे यांनी मानले. सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी ग्रंथपाल विवेक जाधव, सहाय्यक ग्रंथपाल चैताली सुतार, लिपिक चैताली गोसावी आणि शिपाई समिधा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेला नलावडे, संतोष जंगले, मठपती व श्रीम. कुंदे तसेच पोलीस पाटील सीमा घाडीगावकर आणि पालक आदी उपस्थित होते.












