खारेपाटण जि. प. प्राथमिक केंद्र शाळेत जागतिक महिला दिन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या प्राथमिक शाळेत आज ८ मार्च जागतिक महिला दिन कार्यक्रम उस्ताहात व आनंदात साजरा करण्यात आला. खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत विविध वेशभूषा सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. तर शाळेच्या वतीने प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला शालेय विद्यार्थिनीच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर विविध वेशभूषेमध्ये शाळेमध्ये आलेल्या शालेय विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिना निमित्त अभिनय संपन्न असलेली शानदार भाषणे सादर केली.

यावेळी शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे यांनी विद्यार्थ्यांना महिला दिना विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शाळेच्या पदवीधर शिक्षिका शीतल राठोड, सहायक शिक्षिका आरती जोजन, समीक्षा राऊत, दीपिका चव्हाण, शिवलीला निडसोसी,श्रीम. चौधरी, अबिदा काझी आदी शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!