सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव फायनल? अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव अंतिम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या नावाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पसंती दर्शविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

आज झालेल्या भाजपच्या बैठकीत नारायण राणे यांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीदरम्यान अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात असून त्यांना सुमारे सव्वा वर्षांचा कार्यकाळ देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा दुपारी सुमारे तीन वाजेपर्यंत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, अध्यक्षपदाबाबत भाजपकडून कामत यांचे नाव पुढे आले असले तरी उपाध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

प्रमोद कामत यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून काम केले असून भाजपमध्ये त्यांचा प्रभाव मानला जातो. पक्षाशी असलेली जवळीक, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

error: Content is protected !!