चौके (प्रतिनिधी) : 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाट हायस्कूल इयत्ता बारावीच्या 1982/83 या पहिल्या बॅचचे पहिले वहीले गेट टूगेदर खवणे येथे उत्साहात संपन्न झाले. जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस वर्षांनी पहिलेच गेट टू गेदर आनंदमय वातावरणात संपन्न झाले यामध्ये जून्या आठवणीणा उजाळा मिळाला प्रत्येकाला शालेय जीवनाची आठवणहीं यानिमित्ताने ताजी झाली.
या कार्यक्रमात दिलीप भगत, सुनंदा मालवणकर, उदय परब यांच्या गायनाने खूप चागंली रंगत आणली त्यात पाट हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डब्लू. एस. प्रभू यांच्या भेटीने वातावरणात प्रफुल्लित झाले सर्व वर्ग बंधू भगिनींनी सर्व उपक्रमात भाग घेतल्याने कार्यक्रम अतिशय आनंदी झाला. यावेळी सर्व प्रथम सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा व गुलाब पुष्प देऊन तसेच प्रत्येकाची ओळख करून देवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्वांनी आम्ही सर्व आज जे एकत्र झालो ते राघोबा हंजनकर व झिलू गोसावी यांच्यामुळे असे मत व्यक्त केले या गेट टूगेदर कार्यक्रमासाठी या दोघांनी खूप मेहनत घेतली. या गेटटुगेदर मध्ये 35 माजी विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. या सर्व उपस्थितात एकच पती पत्नी जोडपं होतं त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शेवटी सर्वांनी एकमेकांचे ऋण व्यक्त करून सर्वजण पुन्हा एकदा ताज्या आठवणीची शिदोरी घेऊन आपापल्या घरी परतले.










