फोंडाघाट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची खोटले कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी शैक्षणिक सहल

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील इतिहास विभागाच्या वतीने प्रथम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी खोटले (ता. मालवण) येथील प्राचीन कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना इतिहास विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे तसेच प्राचीन वारसा स्थळांचे महत्त्व समजावे हा या सहलीचा मुख्य उद्देश होता.

अभ्यास सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी खोटले परिसरातील प्राचीन कातळशिल्पांचा सखोल अभ्यास केला. खडकांच्या पृष्ठभागावर कोरलेल्या या कातळशिल्पांमध्ये प्रागैतिहासिक काळातील मानवाच्या जीवनाचे विविध पैलू प्रतिबिंबित होतात. प्रागैतिहासिक मानवाने आपल्या दैनंदिन जीवनातील घटना, शिकार दृश्ये, प्राणी-पक्षी, मासे तसेच विविध प्रतीकात्मक चिन्हे खडकांवर कोरून ठेवली आहेत. त्यामुळे त्या काळातील मानवाचे जीवनमान, सामाजिक रचना, धार्मिक श्रद्धा आणि कलात्मक दृष्टिकोन यांचा अभ्यास या शिल्पांमधून करता येतो.

खोटले येथील सड्यावर मानवी आकृती, प्राणी, मासे तसेच वर्तुळाकार व रेषात्मक भूमितीय चिन्हे कोरलेली आढळतात..

error: Content is protected !!