गुढीपाडव्याला बांद्यात मोटारसायकल रॅलीचा जल्लोष

बांदा (प्रतिनिधी) : हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने आज बांदा शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. उत्साह, जल्लोष आणि पारंपरिक संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून नववर्षाचे स्वागत उत्साहात केले.

रॅलीची सुरुवात हिंदवी स्वराज्य धर्मध्वज येथून करण्यात आली. प्रारंभी धर्मध्वज नव्याने फडकावून त्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅलीला सुरुवात होत कट्टा कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळसेवाडी, श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, मोर्येवाडा-आळवाडा मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक, कट्टा कॉर्नर असा मार्ग पार करत रॅलीची सांगता श्री राम चौक येथे करण्यात आली.

या रॅलीच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचे जतन, सामाजिक एकात्मता आणि नववर्षाचे स्वागत उत्साहात साजरे करण्याचा संदेश देण्यात आला. बांदा परिसरातील हिंदू बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!