खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने येथील ग्राहकांना अधिक जलद गतीने सेवा देण्याच्या उद्देशाने खारेपाटण शिवाजीपेठ येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घघाटन नुकतेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण चे शाखा प्रबंधक गणेश शिवतारे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण यांच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेला खारेपाटण येथील मेघना मंगेश गुरव यांच्या या ग्राहक सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जि.प.सदस्य प्राची ईसवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश ब्रम्हदंडे, वैदही बाबरदेसाई, यश कॉम्प्युटर अकॅडमी चे संचालक मंगेश गुरव, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेघना गुरव व मंगेश गुरव यांच्या नवीन व्यवसायास उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
तर”खारेपाटण येथील नागरिकांना व बँकेच्या ग्राहकांना बँकेच्या विविध सेवा या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून एकच चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने ग्राहक केंद्र खारेपाटण पंचक्रोशीतील ग्राहकांना फायद्याचे ठरणार असल्याचे प्रतिपादन यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र खारेपाटण शाखेचे व्यवस्थापक गणेश शिवतारे यांनी केले.












