वैभववाडी भुमि अभिलेख विभागाचा मनमानी भोंगळ कारभार

जमिन मोजणीसाठी अर्ज केलेल्यांना आदल्या दिवशी रात्री भुमि अभिलेखच्या नोटीस

कामचुकार वैभववाडी प्रशासनाला मंत्री नितेश राणेंच्या बुस्टर डोसची नितांत गरज

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सद्यस्थिती पाहता बहुतांश शासकीय कार्यालयातील कर्मचारी मार्च अखेरीस गडबडीत केवळ कागदोपत्री कामे उरकून घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे वैभववाडी भुमि अभिलेख विभागाच्या कार्यालयातील भुमापन अधिकारी जमिन मोजणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व सिमेलगतच्या उमेदवारांच्या घरी जात कोणतीही पुर्व सुचना न देता आदल्या दिवशी रात्रीच्या वेळी नोटीस देऊन सकाळी जमिन मोजणीसाठी हजर रहाण्याच्या सुचना देत आहेत. नियमानुसार संबंधित नोटीस १० ते १२ दिवस अगोदर संबंधितांना पाठवणे आवश्यक असताना सर्व नियम धाब्यावर बसवून भुमि अभिलेख कर्मचाऱ्यांची मनमानी यानिमित्ताने वैभववाडीत पहायला मिळत आहे.

वैभववाडी शहरातील बंद अवस्थेतील सी.सी.टि.व्ही. यंत्रणा व वैभववाडी शहरात भर वस्तीत होत असलेल्या चोरीच्या घटना या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील सर्व प्रशासनाला पालकमंत्री नितेश राणे यांच्या बुस्टर डोसची नितांत गरज असल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!